दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
संतोष राजगुरू यांचा इंदापूर मध्ये राष्ट्रसेवा दलाच्या वतीने इंदापूर तालुक्याचे तहसिलदार श्रीकांत पाटील साहेब यांच्या हस्ते व राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्षा रमेश शिंदे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महात्मा फुले सायकल क्लब राष्ट्रसेवा दलाचे राज्य संघटक महात्मा फुले ग्रुप इंदापूर महात्मा फुले सत्यशोधक प्रतिष्ठान इंदापूर इंद्रेश्वर महिला विकास प्रतिष्ठान इंदापूर या सर्व संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निम्मित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक रेड स्वतिक सोसायटी ऑफ इंडिया चे प्रोजेक्ट डायरेक्टर संत शिरोमणी सावता माळी महाराज सेवाभावी न्यास अरण चे विश्वस्त गावकुस पेपर चे कार्यकारी संपादक संतोष राजगुरू यांना नुकतेच दिल्ली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते संतोष राजगुरू यांनी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भर माळी समाज संघटन उभे केले आहे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थे च्या माध्यमातून गेल्या १६ वारकऱ्यांना मोफत सेवा देणाऱ्या आरोग्य पथकात सामील होऊन जास्तीत जास्त सेवा करतात याचे औचित्य साधून तहसीलदारंच्या हस्ते संतोष राजगुरू यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित प्राध्यापक ताटे सर नगरसेवक पोपट शिंदे कैलास कदम दशरथ भोंग रमेश शिंदे सलीम शेख संभाजी व्यवहारे सह मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील साहेबाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ५१ ज्येष्ठ नागरिकांचा गळ्यात मेडल घालून सन्मान केला व ध्वजारोहण करण्यात आले.