दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- अहमदपूर तालुक्यातील बहुचर्चित व राजकीय चर्चेत असलेल्या रोकडा सावरगाव विशाल कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नुकतीच अटीतटीची निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तेरा पैकी तेरा जागा बहूमताने जिंकून अखेर सताधाऱ्याकडून सोसायटी ताब्यात घेतली आहे.
रोकडा सावरगाव सेवा सोसायटी अंतर्गत टाकळगाव, परचंडा,गोथाळा,भुतेकरवाडी,कोळवाडी आदि गावाचा समावेश असल्याने तालुक्यातील सर्वात मोठी सेवा सहकारी सोसायटी असल्याने या निवडणुकीला विषेस असे महत्त्व प्राप्त झाले होते.
कोल्हापूर येथील उद्योजक तथा टाकळगावचे उपसरपंच. परमेश्वर घोगरे यांच्या सुक्षम नियोजनाने दिगाबंर कदम, शिवकुमार कदम, शिवकुमार घोटे,खंडूराम जगताप, अशोक रोकडे, बालाजी जाधव,किशन जाधव,शबेमेहराज शेख,सौ.विजयमाला जगताप,सौ.लताबाई बेल्लाळे, गोपाळ दराडे, रोहित घोटे, गणपती कावळे हे तेराच्या तेरा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय झाले.
सदरील विजयासाठी रमेश पाटील, बालाजी घोटे, बाजीराव पाटील, उत्तम घोटे,रामभाऊ बेल्लाळे, उमाकांत बेल्लाळे, डॉ.भगवान घोगरे,विश्र्वांभर बेल्लाळे, ,मोहन मुरुडकर,सुशिल घोटे, नाथराव रोकडे,लक्ष्मिन रा़ेकडे, कल्यान काळे,बालाजी बेल्लाळे, प्रशांत जाधव, कपिल मुरुडकर,प्रशांत बेल्लाळे ,जनार्धन जाधव पंडित बेल्लाळे बालाजी बोडके, हणमंत कोटंबे, देविदास इंगळे, सुधाकर मुरुडकर, सुरेश रोकडे,रमाकांत रा़ेकडे ,ज्ञाना़ेबा गुजराथी ,केरबा कांबळे, विनायक दराडे, शिवशंकर हिप्परगे, गुणवंत जगताप, देविदास जगताप,जनार्दन जाधव, दिपक जगताप, रमाकांत जगताप, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर कदम, गोविंद जगताप, अणिल शेळके , गणेश कोदळे, शेषेराव कोदळे यांच्या सह अनेकांनी मेहनत घेऊन विजयश्री खेचून आणली. विद्यमान आमदारांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या ताब्यात
गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सोसायटी अखेर माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बहूमताने जिंकल्याने विजयी उमेदवारांनी व समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन फटाक्यांची आतषबाजी करून रोकडा सावरगाव सह तालुक्यात मोठा आनंद उत्सव साजरा केरण्यात आला.