दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शिवराज्य शेतकरी विकास मंचची इंदापूर या ठिकाणी झालेल्या मीटिंगमध्ये ज्योतीताई गाढवे यांची शिवराज्य शेतकरी विकास मंच च्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर त्यांना निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष जावेद शेख यांनी दिले यावेळी शिवराज्य शेतकरी विकास मंच महाराष्ट्र कार्याध्यक्ष वैभव सोनवणे त्याचप्रमाणे महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲड. किरण मखरे व इंदापूर तालुका शिवराज्य शेतकरी विकास मंच चे तालुका अध्यक्ष गुणवंत दळवी त्याचप्रमाणे शिवराज्य शेतकरी विकास मंचचे कार्यकर्ते अली अकबर मनेरी सोहेल, तांबोळी इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर ज्योतीताई यांनी झालेल्या भाषणामध्ये शिवराज्य शेतकरी विकास मंचच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, गरीब, महिला यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवराज्य शेतकरी विकास मंच च्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .शिवराज्य शेतकरी विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष यांनी दाखवलेल्या विश्वासाला मी सार्थक करीन असे ही ज्योतीताई गाढवे यांनी निवडीनंतर सांगितले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर सर्व जिल्हा व तालुक्यामध्ये शिवराज्य शेतकरी विकास मंच शाखा ओपन करू असेही ज्योतीताई गाढवे यांनी झालेल्या भाषणात सांगितले .येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती, विधानसभा व लोकसभेच्या जागा शिवराज्य शेतकरी विकास मंच ताकदीनिशी लढणार असल्याचेही ज्योतीताई गाढवे यांनी सांगितले.