दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुखांची घोषणा खासदार धैर्यशील माने व राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचे चिरंजीव सुजित चव्हाण आणि इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी नेमण्यात आले आहे.
चव्हाण यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण,उत्तर,करवीर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.रवींद्र माने,यांच्याकडे,हातकलंगले,शाहूवाडी,शिरोळ,पन्हाळा, इचलकरंजी, मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीची पत्रे धैर्यशील माने,राजेश क्षीरसागर यांनी दिली. चव्हाण हे शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत.माने यांनी इचरकरंजी नगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्ह्यासह तालुका शहर आणि विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची घोषणाही करण्यात येणार आहे. असेही आज पत्रकार परिषद मध्ये खासदार माने व क्षीरसागर यांनी घोषित केले.
यावर प्रतिक्रिया देत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे गटाच्या नवीन शिवसेना जिल्हा प्रमुखाची निवड झाली आहे असे विचारल्यानंतर पत्रकार परिषद मध्ये त्यांनी असे सांगितले की, वेळ काळ ठरवेल कोणती शिवसेना खरी आहे. तसेच हा एक गट आहे व आमचा पक्ष आहे हा त्यांच्यातला आणि आमच्यातला हा फरक आहे. शिवसेना कोणाची आहे धनुष्यबाण कोणाचा आहे .हे न्यायदेवता ठरवेल न्यायदेवतावर आमचा विश्वास आहे. तसेच ५६ दिवसाच्या हा गट व आमचा ५६ वर्षाचा पक्ष आहे.