दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
◼️लोहा तालुक्यात वृक्षारोपणात भ्रष्टाचार अधिकारी लाचार
लोहा – वृक्षारोपण हि काळाची गरज या योजनेचे शासनाने प्रत्येक जिल्ह्यात मोठे उद्दिष्ट ठरवून दिले होते. पण या वृक्षारोपण योजनेत लोहा तालुक्यात निळा ते शेलगाव या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे शासनाचे उदिष्ट होते. या ठिकाणी वृक्षारोपण कागदावरच करण्यात आले असुन या योजनेत बट्टयाघोळ झाला आहे या सर्व प्रकारची तातडीने चौकशी करा अन्यथा नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण करुन आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष गोविंद पा वडजे यांनी दिला आहे.
लोहा तालुक्यातील निळा ते शेलगाव या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बोगस वृक्षलागवड दि 08-06-2021 ते दि 10-08-2022 या कालावधीत भाग – 1 एक किलोमीटर व भाग – 2 एक किलोमीटर आंबेसांगवी व निळा येथील बोगस मजूर दाखवून व हि वृक्षलागवड योजना कागदावरच दाखवुन या मोहिमेत लाखो रूपायांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगणमत करून लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गोविंद पा वडजे यांनी केली आहे.
दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा , पर्यावरण हि काळाची गरज , अशा शासनाच्या योजनेला अधिकारी व कर्मचारी यांनी लोहा तालुक्यात केराची टोपली देत वृक्षारोपण न करताच लाखो रूपायांचा भ्रष्टाचार करणारे अधिकारी व कर्मचारी लचार झाल्याचे चित्र दिसुन येत आहे.
शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वृक्षलागवड मोहिमेत खर्च होतो. दरम्यान तालुक्यात सामाजिक वनीकरण विभाग व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय व इतर यंत्रणेच्या माध्यमातून निळा ते शेलगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कागदावरच बोगस वृक्षालागवड केल्याचे दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असुन या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करा अन्यथा दि. 22-08-2022 रोजी नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण करुन धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गोविंद पा वडजे यांनी दिला आहे.