दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कै.प्रा.रामचंद्र पाटील गायकवाड यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्त कळका येथील सभागृहास 100 खुर्ची चे वाटप करण्यात आले
कळका येथील प्रा. रामचंद्र पाटील कळकेकर यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे चिरंजीव डॉक्टर संजय कळकेकर व विरेंद्र कळकेकर यांनी कळका येथील सभागृहास 100 खुर्ची चे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून प्रा. सुभाष तिवडे हे होते कळका येथील सरपंच सौ सुनंदा हरीभाऊ गादेकर,उपसरपंच राजु पाटिल कळकेकर, चेअरमन व्यंकटराव पाटील कळकेकर, डॉ.हरीभाऊ गादेकर,डॉ. ज्ञानेश्वर कळकेकर, व्यंकटराव गायकवाड गुरुजी,विलास पाटील पो.पाटील, संभाजी पाटील कळकेकर, व्यंकटेश पाटील गायकवाड, ऊत्तम पाटिल गायकवाड, भाई गोविंदराव पाटिल गायकवाड, प्रदीप गायकवाड, नवनाथ पाटील गायकवाड, रामचंद्र पाटील गायकवाड, कैलास पाटील कदम जानापुरीकर, ओम प्रकाश कदम,गणेश जाधव, सुत्रसंचालन अविनाश कळकेकर यांनी केले व आभार संभाजी कुंमदळे यांनी मानले.