दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी-
नांदुरा :- स्वतःच्या खिशाला कात्री लावून गरीब पेशंटसाठी मदत करणारे असंख्य हात या जगात आहेत. काही अनामिक राहून वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचे हात पुढे करतात. तर काही संस्था रुग्णसेवेचा वसा घेऊन कार्य करीत आहेत त्यातीलच एक जाणीव फाऊंडेशन प्रत्येक वेळी गरजू व्यक्तींच्या मदतीला धावते एवढे मात्र नक्कीच, तालुक्यातील टाकरखेड येथील अल्पभूधारक शेतकरी रविंद्र सुधाकर जाधव यांची कन्या कु.तेजस्विनी जाधव हिला मेंदुज्वर या जीवघेण्या आजाराने ग्रासले होते, घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची परिस्थिती असतांना या संकटाचा सामना कसा करायचा हा मोठा प्रश्न ह्या कुटुंबा पुढे येऊन ठेवला असतांना जाणीव फाऊंडेशनचे मदतकार्य नसुन एक हक्काचे मदतीचे घर आहे. येथे फुल ना फुलाची पाकळी मदत होते, अशी महिती मिळताच रविंद्र जाधव यांनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रांजलीताई धोरण यांना संपर्क साधत सर्व प्रकारची माहिती दिली. जाणीवच्या वतीने मदतीचे आवाहन करून मदतनिधी एकत्र करून रुग्ण कु.तेजस्विनी रविंद्र जाधव हिच्या राहत्या घरी टाकरखेड येथे जाऊन अल्पशा स्वरुपात फुल ना फुलाची पाकळी म्हणून १०,००० हजार रु, मदत चेक स्वरुपात मुलीचे वडील श्री.रविंद्र सुधाकर जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी गणेश मानकर, संजय जुनारे व जाणीव फाउंडेशनच्या वतीने सतिश भिसे, सचिव मनोज यादव, पत्रकार गणेश वाघ उपस्थित होते. या मदतीसाठी विलास जुनारे, दत्ता पाटील, सचिन तायडे, गणेश पाटील, गजानन चौधरी, इमरान खान, उमेश कोरडे, विजय गोरे, निलेश वाघ, कृष्णा मापारी, अरुण देशमुख, सौरभ चांडक, सागर रोकडे, दिलीप पाटील, किरण निवाणे, तेजस इंगळे, विशाल इंगळे, अनिल गीऱ्हे, सचिन ढोन, सतिश भिसे पाटील, निलेश अंभोरे, अनिता कावडे, गोपाल अढाव, शिवा कडूकार, नंन्दु जाधव, गणेश जावरे, दीपक डिवरे, सुनीता ताथोड,लाभले. यादव, प्रांजली धोरण यांचे योगदान लाभले. यावेळी गणेश मानकर, संजय जुनारे व जाणीव फाउंडेशनच्या वतीने सतिश भिसे, सचिव मनोज यादव, पत्रकार गणेश वाघ उपस्थित होते.