दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी देवस्थानात आज दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळली होती.
परभणी तालुक्यात असलेल्या सुप्रसिद्ध अशा श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी देवस्थान आहे. परभणी सह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून हजारो भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिन्यातील आज दि. २० ऑगस्ट रोजी चौथा व शेवटचा शनिवार होता. श्रावण महिन्याव्यतिरिक्त अन्य वेळी व सणासुदीला सुध्दा येथे भाविक भक्तांची मोठी वर्दळ असते. मग आता तर अत्यंत महत्वपूर्ण व उपवास कालीन असा श्रावण महिना सुरू आहे. या पर्वावर अलोट गर्दी राहिली जाणे स्वाभाविकच आहे. मिळेल ते वाहन घेऊन किंवा पायी जावे लागले तरी बेहत्तर, परंतु दर्शन झाले तरच श्रावणाचे आणि आजच्या शनिवार उपवासाचे ध्येय सार्थकी लागली जाईल, जणू याच भावनेने अशी गर्दी
उसळली जाणे स्वाभाविक आहे.