दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::”::::
आर्णी तालुक्यातील असलेल्या सावळी सदोबा येथे परिसरातील पध्दतीने आज बंजारा समाजाच्या वतीने तिजं उत्साह साजरा करण्यात आला. त्या ठिकाणी प्रत्येक गावातील नाईक, कारभारी, गावातील मुली व महिला मंडळ ,वाद्य सहित घेऊन सावळी येथे भिकू नाईक च्या घरी समाज बांधवांनी एकत्र होऊन सर्कलच्या दृष्टिकोनातून समाजाला एक रुढी परंपरा दिशा देण्यासाठी समाजाचां सण हा एक पारंपारिक आहे लोकांना संदेश देण्यासाठी हा सण साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून मोठ्या थाटामाटाने हा सण साजरा करण्यात आले आहे…
व त्या ठिकाणापासून मिरवणुक चालू केले. मुलींनी आपल्या बंजारा भाषेमध्ये गीत गायन केले.
चाली चाली रे.. दयाळू विर,आज मं चालीरे मनं लेयनं आयो रे विर, आज मं चाली रे….!
अशा प्रकारे तिज़ उत्साह सुरूवात झाली त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भिकुजी नाईक , डॉ,रामचरण चव्हाण, माजी. बालकल्याण सभापती जि. प. सौ. ज्योतीताई रामचरण चव्हाण, माजी जि.प. सदस्य प्रकाश भाऊ राठोड ( कुष्णनगर) विनोद दत्ता जाधव, मिलिंद चव्हाण , बाबूसिंग पवार ,पुनाजी महाराज, विठ्ठल दिपलाजी राठोड, अविनाश भाऊ राठोड पोलीस पाटील,अनिल सिताराम पवार पुंडलिक राठोड, सुदाम नाईक (पुरुषोत्तम नगर) बळीराम नाईक (बारभाई) , रमेश नाईक दिलीप राठोड कारभारी (सुभाष नगर) संजय राठोड, सुरेश पवार, असे प्रत्येक गावातील नाईक, कारभारी , अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.