दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणी होणा-या दिरंगाई प्रकरणी परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले.
हिंदू जनजागृती समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणात जे आरोपी पकडण्यात आले आहेत, त्यांच्या विरोधात अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याची खंत व्यक्त करीत परभणी हिंदू जनजागृती समितीने शुक्रवार, दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना एक निवेदन देण्यात आले आहे.
या दु:खद् घटनेला सुमारे नऊ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे तरी तपासात कमालीची दिरंगाई केली जात आहे. यात सामील सर्व संघटना व मुख्य सुत्रधार यांना तात्काळ अटक करुन त्यांची सर्व संपत्ती व मालमत्ता जप्त करण्यात यावी असेही त्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अविनाश पाटील, संजय बनसोडे यांच्यासह अनेकांची नावे असल्याचे समजते.