दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
दि. 30 ऑगस्ट रोजी मौजे वझरगा येथे वारकरी चालवळीचे महानायक, पर्यावारणाचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीचा धिक्कार करणारे, बाराव्या शतकातील पहिले संत,एकंदरीत आपल्या कीर्तन अभंगाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनांचा
जनमाणसाला संदेश देणारे राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांची 778 पुण्यतिथी अखिल भारतीय जिवा सेना संघटना वझरगा यांच्या कडून मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्व सदस्य श्री. मारोती, कन्नावार, संग्राम कोंडावार,नरशींग वझरगेकर,यादव कन्नावार,विठ्ठल कोंडावार, यादव सज्जन, ग्रामपंचायत सदस्य कोंडावार सायलू, संभाजी कन्नावार,भूमेश कन्नावार, देगलूर तालुका उपाध्यक्ष कोंडावार साईनाथ, संदीप कन्नावार गावातील काही मान्यवर असंख्य नागरिकांच्या उपस्थित साजरी करण्यात आली.