दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: बिलोली तालुक्यातील भोपळचा ३० वर्षीय तरुण केरूळ जवळ ट्रॅव्हल्सच्या धडकेत जागीच ठार रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नांदेड देगलूर राज्य महामार्गावर बिलोली तालुक्यातील केरूर वळणदार घाटावर मोटरसायकल व खाजगी ट्रॅव्हल्स बसची धडक होऊन झालेल्या या भिषण अपघातात मोटरसायकल वरील भोपाळा येथील तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील पंडित मनोहर बावणे वय ३२ वर्ष हे सासरवाडी असलेली बिलोली तालुक्यातील सगरोळी येथून आदमपूर फाटा मार्गे मोटारसायकल वरुन नरसी कडे येत असताना सदर मोटारसायकल नांदेड देगलूर राज्य महामार्गवरील केरुर घाटावरील वळणं रस्त्यावर येताच नरसी कडून देगलूर कडे भरधाव वेगाने जाणारी खाजगी बस क्र. एम एच १२ एच.बी.०८५३ यांची जोरदार धडक होऊन मोटारसायकल वरील पंडित मनोहर बावणे हा जागीच ठार झाला.