दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
भुईंज कवठे हद्दीमध्ये चहा पिण्यासांठी थांबलेल्या शिवशाही बस मधून २१ लाखाची दागिन्यांच्या जबरी चोरी प्रकरणांत गुन्हे प्रकटीकरण पथकांने मोबाईल लोकेशन सी.सी.टीव्ही फुटेच्या आधारे उत्तराखंड येथील डेहराडूनमधून तिघांना ताब्यांत घेवुन त्यांच्याकडे सखोल चौकशी करुन त्यांना अटक करण्यांत आली. त्यांना वाई न्यायालयांत हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सोनविण्यांत आली. महिपाल रामगोपाळ सिंग, विरवहाददर रमेश सिंग, महेशकुमार दयाराम सिंग अशी अटक करण्यांत आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन १५ ऑगस्ट रोजी राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही चहा पिण्यांसाठी हॉटेल राजमध्ये थांबली होती तेव्हा एसटीमधून तब्बल २१ लाख रुपये किमतीचे सोन्यांचे दागिने चोरीस गेल्यांची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यांत नोंद होती.भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.आशिष कांबळे व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांने मोबाईल,लोकेशन आणि सी.सी.टीव्ही फुटेज च्या तांत्रिक माहितीच्या आधारे संशोधन करीत थेट भुईंज पोलिसांचा ताफा उत्तराखंड येथील डेहराडूनमध्ये पोचला. आरोपींना ताब्यांत घेवुन त्यांना पोलीस खाकया दाखवताच त्यांनी चोरीची कबुली भुईंज पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्याकडूंन चोरी केलेले १७५ ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले. उर्वरित सोने व यांतील अन्य आरोपी मिळविण्यांसाठी विशेष पथकांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना ताब्यांत घेवुन मुद्देमाल हस्तगत करण्यांत आला. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख मा.अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक मा.अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. डॉ.शितल जानवी खराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री.आशिष कांबळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे सहायक पोलीस फौजदार विकास गंगावणे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गजें पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.