दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा. प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
रहाटी:- कंधार तालुक्यातील राहटी व वरवंट या दोन गावात एक सेवा सहकारी सोसायटी आहे. या सोसायटीची निवडणूक पार पडली या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे निळकंठ कौंसल्ये, आप्पाराव वडजे हे दोन्ही कार्यक्रते आ. श्यामसुंदर शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ही सोसायटी शिंदे साहेबांच्या ताब्यात आली आहे. या सोसायटी मध्ये तेरा सदस्यांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये बिनविरोध निवडून आलेले पाच सदस्य आहेत. विश्वाभंर वाघमारे, बालाजी कौंसल्ये, आनंदा पोपटे, लक्ष्मण कौंसल्ये, या निवडणुकीत विजयी झालेल्या सुरेखा कौंसल्ये, चांगूनाबाई देशमुख यांनी विजय मिळवला आहे. गावातील नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला होता. यावेळी ज्ञानेश्वर कौंसल्ये, विलास कौंसल्ये, प्रकाश कौंसल्ये, मारोती घोरपडे, दौलत कौंसल्ये, व्यंकटी कौंसल्ये, गिरीराज कौंसल्ये, चंदर हंबर्डे, साहेबराव टोम्पे, आनंदा कौंसल्ये, मारोती गायकवाड, चांदू गायकवाड, साईनाथ वडजे, पप्पू देवडे, वसंत जोशी, आनंदा गिरी, आनंदा धोपटे, वसंत निलेवाड, उध्वव निलेवाड रमेश देशमुख गावातील नागरीक, पत्रकार, परीसरातील कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.