दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
बहरीन.येथे दि . २२ ते २ ९ ऑगस्ट २०२२ दरम्यान झालेल्या २१ व्या एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेत २० वर्षांखालील मुलांच्या भारतीय व्हॉलीबॉल संघाने रौप्यपदक पटकावले . तब्बल २० वर्षांनंतर मिळालेल्या या पदकामुळे भारतीय संघ २०२३ साली होणाऱ्या जागतिक व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे . इराणबरोबर चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात ३-१ अशा सेटनी ( २५- १२ , २५-१९ , २५-१७ व २२-२५ ) पराभव पत्करून भारतीय संघास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले . भारतीय संघाचा कर्णधार दुष्यंतसिंह जाखर मुरगूड आशिया व्हॉलीबॉल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा २० वर्षाखालील भारतीय संघ . याची एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेत बेस्ट ब्लॉकर , तर कार्तिकेयनची बेस्ट लिबेरो म्हणून निवड झाली असून , भारतीयांसाठी ही भूषणावह ठरली आहे . भारतीय संघाला हे रौप्यपदक तब्बल २० वर्षांनंतर मिळाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये भारतीय व्हॉलीबॉल संघाचे अभिनंदन होत आहे . शेखो , हर्षित गिरी , सचिन डगर , कार्तिकेयन ( लिबेरो ) , संघाचे प्रशिक्षक जी . ई . श्रीधरन , सहायक प्रशिक्षक राजेश , प्रवीण शर्मा , संघ व्यवस्थापक प्रा . बशीर नीळकंठ हे संघासोबत आहेत . संघातील खेळाडू असे दुष्यंतसिंह जाखर ( कर्णधार ) , अमन कुमार , समीर चौधरी , अजित भारतीय संघाच्या या अभिनंदनीय कामगिरीबद्दल भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे अध्यक्ष खा . डॉ . अच्युत सामंता व सीईओ व राजस्थान ऑलिम्पिक संघटनेचे चेअरमन आंतरराष्ट्रीय खेळाडू राम अवतारसिंह जाखर , सचिव अनिल चौधरी , सहसचिव प्रा . बाळासाहेब सूर्यवंशी व प्रशिक्षक योगेश वराळे यांनी दैनिक चालू ला माहिती दिली इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले असून , सर्व स्तरावरून संघाचे अभिनंदन केले जात आहे