दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-राजेश गेडाम
सनीज स्प्रिंग डेल शाळा भंडारा येथे विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक माननीय अजित आष्टीकर उपस्थित होते त्यांनी आणि माननीय प्राचार्या शेफाली पाल यांनी प्रतिनिधींना बॅच आणि नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले तसेच त्यांना जबाबदारी आणि कर्तव्या विषयी माहिती दिली प्रतिनिधींच्या परिश्रम आणि समर्पणाचे कौतुक करीत सतत समर्थन आणि सकारात्मक अभिप्राया बद्दल पालकांचे आभार मानले शपथविधी सोहळ्याचे नेतृत्व संचालन समन्वयक ज्योति साहू यांनी केले तर आभार प्रदर्शन सह समन्वयक लीना चाचेरे यांनी केले प्रतिनिधी शपथविधी वार्डन संपदा देशपांडे, शितल मुधोळकर, ज्योती साखरकर आणि गीता मोटघरे यांच्याद्वारे पार पडला विद्यार्थी प्रतिनिधी नियुक्ती कार्यक्रम प्रायमरी प्रमुख समृद्धी गंगाखेडकर, केजी प्रमुख कल्पना जांगडे,शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रतिनिधी पालकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला शाळेचे सचिव माननीय खासदार सुनील मेंढे यांनी विद्यार्थी प्रतिनिधिचे अभिनंदन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.