दैनिक चालु वार्ता अर्धापुर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
पुण्यातील गुरुजी तालीम मंडळाचा अर्धापूर पत्रकार संघाला पूरस्कार प्रदान..
अर्धापूर पत्रकार संघाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या पुण्यजागार प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला खूप मोठा आधार मिळाला आहे.अर्धापूर पत्रकार संघाचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असुन आशा कार्याची समाजाला गरज आहे.यंदाच्या गणेशोत्सव पासून गूरुजी तालीम मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या संस्था गूरुजी तालीम पूरस्काराने गौरविण्यात येत आहे.त्यासाठी विविध क्षेत्रातील पाच संस्थांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी यांनी शुक्रवारी (ता दोन) दिली.
पुण्यातील मानाच्या तिसरा मानाचा गणपती श्री गुरूजी तालीम मंडळाच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल यंदाच्या वर्षापासून गुरुजी तालीम सामाजिक पूरस्कार सूरु करून एक वेगळा उपक्रम सुरू केला असून सामाजिक बांधिलकी या मंडळाने जोपासली आहे.तसेच हे मंडळ सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करित असतो.यंदाच्या पहिल्या वर्षाचा पहिला पुरस्कार गूरुजी तालीम सन्मान पुरस्कार अर्धापूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या पुढाकारातून अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत साहित्य देवून आत्मनिर्भर करण्यासाठी पूण्यजागर राबविण्यात येत आहे.हा प्रकल्प राबविण्यासाठी पत्रकार संघ सहकार्य करित आहे.या कार्याची दखल पुण्यातील गूरुजी तालीम मंडळाने घेतलीं आहे.हा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हास्ते गणरायाची आरती,पुजा करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी, विश्वस्थ प्रथ्वीराज परदेशी, राजू परदेशी , भोई प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ मिलिंद भोई, महेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते.पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले . उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी पत्रकार संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.या सोहळ्याचे सुत्रसंचलन शिक्षण तज्ज्ञ अर्चिता मडके यांनी केले.मंडळाच्या वतीने २१ हजारचा धनादेश, श्रींचा फोटो प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.या वेळी तालुका अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, सचिव गुणवंत विरकर, पूण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळें, उपाध्यक्ष गोविंद टेकाळे, प्रसिद्ध प्रमुख उद्धव सरोदे, शेख साबेर, दिगांबर मोळके, शंकरराव ढगे, अनिल मोळके, छगन इंगळे, संदिप राउत, सय्यद युनुस नदाफ, शेख मौला, गंगाधर सुर्यवंशी आदी उपस्थित होते.