दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: जिल्हा परिषद हायस्कुल मरखेल ता. देगलूर जि.नांदेड येथे वारंवार अर्ज / निवेदन देवूनही कायमस्वरूपी माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येत नसल्याने दि.15/09/2022 रोजी या शाळेला आम्हा गावक-यांच्या वतिने कुलूप ठोकत असले बाबत. निवेदन देण्यात आले. या शाळेत 1 ते 10 पर्यंत चे वर्ग असून 570 विद्यार्थी ज्ञानार्जन करित आहेत. येथील मंजुर शिक्षक संख्येपैकी प्राथमिक (01) माध्यमिक शिक्षकाची (03) पदे हि राजपत्रीत मुख्याध्यापकासह रिक्त आहेत. स्पर्धेच्या युगात खाजगी शाळा सोबत सध करून ही अव्वल ठरलेल्या या शाळेत माध्यमिक विभागाचे गणित इंग्रजी या महत्वाच्या विषया सह अन्य भाषा विषयाच्या शिक्षकाची महत्त्वपूर्ण पदे रिक्त आहेत. या संदर्भात वारवार शाळा प्रशासन शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतिने तक्रारी करूण शिक्षकांची मागणी करण्यात आली होती मात्र आपल्या कडुन व शिक्षक विभागाकडुन कुठलाच प्रतिसाद न देता आमच्या निवेदनास केराची टोपली दाखवण्यात आली आहे. आज रोजी आम्हा गावक-यांच्या वतिने होत असलेले प्रशासनाच्या दुर्लक्षित प्रकारामुळे या शाळेला दि.15/09/2022 रोजी कलुप ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला असून जोपर्यंत या शाळेत कायम स्वरूपी शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येणार नाहित तोपर्यंत गावक-यांच्या वतीने कुलुप बंद आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील हि नम्र विनंती असे निवेदन देण्यात आले