दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : केके वेणुगोपाल यांनी अॅटॉर्नी जनरलचे पद रिक्त केल्यानंतर त्यांच्या जागी ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांना देशाचे नवे अॅटॉर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.
ते देशाचे 14 वे अॅटॉर्नी जनरल असतील. रोहतगी हे 2014 ते 2017 या काळातही अॅटॉर्नी जनरल होते. त्यानंतर या पदावरील ही त्यांची दुसरी कारकिर्द असणार आहे. के.के.वेणुगोपाल यांनी 30 सप्टेंबरनंतर आपण अॅटॉर्नी जनरल या पदावर राहणार नाही असे सांगितले होते. वेणुगोपाल यांना मुदतवाढ देण्यात आली होती ज्याची मुदत 30 सप्टेंबरला संपणार आहे. वेणुगोपाल यांना 1 जुलै 2017 रोजी अॅटॉर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दोन वेळा एक-एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती