दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अहमदाबाद: या वर्षाच्या अखेरीस हिमाचल आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.
एकीकके गुजरात काबीज करण्यासाठी AAPचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील भाजपचा जोरदार प्रचार करत आहेत. मंगळवारी शहांनी आपवर जोरदार हल्लाबोल केला.
शहा पुढे म्हणाले, ‘मला स्पष्टपणे दिसत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूपेंद्र पटेलांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा आगामी निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल. आपचे राष्ट्रीय संयोजक म्हणतात की, त्यांचा पक्ष सत्तेत आल्यावर राज्यातील भ्रष्टाचार मिटवला जाईल. पण, यांच्याच पक्षातील अनेकजण भ्रष्टाचारी आहेत. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की, त्यांनी या लोकांच्या नादी लागू नये,’ असा हल्लाबोल शहांनी केला.