दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी तालुक्यात गुरुवार १५ सप्टेंबर रोजी “माझी शेती माझा सातबारा,मीच नोंदविणार” माझा पीक पेरा अंतर्गत ई-पीक तपासणी मोहीम अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आली.तहसीलमधील ३६ हजार ७२८ खातेदारांची ऍपवर नोंदणी करण्याचा मानस आहे असे तहसीलदार अभिजित जगताप यांनी म्हटले.
तसेच मोहिमेबाबत सरपंच,ग्रामसेवक,पोलीस पाटील तलाठी,कृषी सहाय्यक,सेतू संचालक यांनी शेताच्या धुऱ्यावर भेट देऊन जनजागृती करून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन तहसीलदार अभिजित जगताप यांनी यावेळी केले आहे.