दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-आगामी काळात दुर्गोत्सव,दसरा असे सण साजरे होणार आहेत.यावेळी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहरातील जिल्ह्यातून सात कुख्यात गुन्हेगारांना दोन वर्षांकरीता तडीपार करण्याचे आदेश शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी जारी केले आहेत.या कारवाईसाठी शहर पो.आयुक्त आरती सिंह यांनी शहर पो.आयुक्तालयाचे दोन्ही पोलीस उपायुक्त,सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांना वास्तव्यास असलेल्या व्यावसायिक गुन्हेगारांच्या संपूर्ण नोंदी घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.पोलीस रेकॉर्डवर त्यामुळे फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३,गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ आणि वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ अशा एकूण ७ कुख्यात आरोपींना शहरासह जिल्ह्यातून झोन क्रमांक १ चे पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले आणि या आदेशाला शहर पो.आयुक्त आरती सिंह यांनी मान्यता दिली आहे.या संदर्भात शहर पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,सोन्या उर्फ प्रफुल अजय वानखेडे (वय १९,एकता नगर),अक्षय प्रकाश मते (वय २७,आशियाना क्लबजवळ) आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सूरज सदानंद तायडे (वय २०,वडाळी),गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहम्मद इम्रान उर्फ जवाई मोहम्मद जमील (वय ३५,नूर नगर),अब्दुल रफिक उर्फ रफिक पहेलवान अब्दुल रहीम (वय ३६,नुरानी मज्जीद जवळ),मोहम्मद खालिद मोहम्मद मुस्ताक (वय ३९,पठाणपुरा) तर वलगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेख नदीम शेख नबी उर्फ कालू (वय ३२,सतीनगर) यांना अमरावती शहरासह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यादरम्यान यातील कोणीही आरोपी तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे सुद्धा पो.आयुक्त आरती सिंग यांनी म्हटले.