दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा बु. येथील उपसरपंच यांचे पती आणि ४ ग्रापंचायत सदस्यांसह १ ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीला ४८ हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी १४ सप्टेंबर रोजी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने अंजनगाव सुर्जी तालुक्यात खळबळ उडाली आहे.मुऱ्हा बु.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे साहित्य हर्रास केल्याप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापकाकडे ५५ हजार रुपयांची मागणी केली होती.सदर जि.प.शाळा ही २०२१ साली डिसिमेंटल करण्यात आली याची तक्रार मागे घेण्याच्या तडजोडी अंती २५ हजार व २३ हजार अश्या दोन टप्प्यात सहा जणांना ४८ हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.मुख्याध्यापकाकडून लाच मागण्याच्या तक्रारीवरून अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच घेतांना सहा आरोपींना रंगेहात पकडले.लाच घेणाऱ्यांमध्ये आरोपी दामोधर धुमाळे (वय ६५ वर्षे) ग्रा.सदस्य मुऱ्हादेवी ता.अंजनगाव सुर्जी,आरोपी मनोज कावरे (वय ४३ वर्षे) ग्रा.सदस्य मुऱ्हादेवी ता.अंजनगाव सुर्जी,आरोपी लालदास वानखडे (वय ४३ वर्षे) ग्रा.सदस्य मुऱ्हादेवी ता.अंजनगाव सुर्जी,आरोपी मोहम्मद इब्राहीम अब्दुल नबी (वय ६० वर्षे) ग्रा.सदस्य मुऱ्हादेवी ता.अंजनगाव सुर्जी,आरोपी शिवदास पखान (वय ५२ वर्षे) ग्रा.सदस्य यांचे पती मुऱ्हादेवी ता.अंजनगाव सुर्जी,आरोपी सुरेश वानखडे (वय ४२ वर्षे) उपसरपंच यांचे पती मुऱ्हादेवी ता.अंजनगाव सुर्जी असे अटक केलेल्यांची नावे आहेत.दरम्यान याप्रकरणी बुधवारी दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ अँड रेडियम आर्ट अंजनगाव सुर्जी दर्यापूर रोड येथे धाड टाकण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांना यश मिळाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.या तक्रारीनुसार,अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड,अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत,अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे,पोलीस उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरीक्षक सतीश उमरे,पो.निरीक्षक योगेशकुमार दंदे,पो.निरीक्षक संतोष इंगळे,युवराज राठोड,विनोद कुंजाम,कुणाल काकडे,रवींद्र मोरे,रोशन खंडारे सह चालक प्रदीप बारबुद्धे,गोवर्धन नाईक यांनी पार पाडली.