दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
उस्मानाबाद जिल्ह्यांतील कार्ला येथील कुत्र्याने मटन खाल्ल्याने मुलीवर गावठी बंदुकीच्या गोळ्या झाडून तिच्या हत्या करण्यांत आल्यांची घटना समोर आली आहे. तुळजापूर तालुक्यांतील कार्ला पती गणेश भोसले व आई मीराबाई गणेश भोसले यांनी रविवारी त्यांची मुलगी (काजल मनोज शिंदे वय २२) हिला कुत्र्यांने मटन खाल्ल्यांच्या कारणावरुन शिवीगाळ करुन. त्यानंतर वडील गणेश भोसले यांनी काजलवर आपल्या जवळील गावठी बंदुकीतून गोळी झाडली यांत काजल गंभीर जखमी झाली. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन २२ वर्षीय मृत काजल शिंदे ही तिच्या माहेरी पती समवेत राहत होती. रविवारी जेवणासाठी घरात मटण आणून काजलने रस्सा केला होता. मटणाचा रस्ता झाल्यानंतर ती घरात इतर कामे करीत होती. त्याचवेळी एका कुत्र्यांने जेवणासांठी तयार केलेला मटण खाल्ल्यांने हा प्रकार काजलची आई मीराबाईने पाहिल्यानंतर तिने याचा जाब विचारण्यांस सुरुवात केली यातून दोघींमध्ये चांगलाच वाद विकोपाला गेला. याच दरम्यान दारुच्या नशेत असलेले वडील गणेश भोसले यांनी खुंटीवर टांगून ठेवलेल्या गावठी बंदुकीतून पोटच्या मुलीवर गोळी झाडली या घटनेनंतर गणेश भोसले व आई मीराबाई भोसले यांच्या विरोधांत नळदुर्ग पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यांत आला. मनोज सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवरुन बी.डी क्र. कलम नुसार ३०२,५०४,५०६,३४ नळदुर्ग पोलीस ठाण्यांत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यांत आला. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर विभागांच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सौ.साई भोर-पाटील मॅडम यांच्यासह नळदुर्ग पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी करीत आहेत.