दैनिक चालू वार्ता हीमायतनगर प्रतिनीधी:राम चिंतलवाड
मौजे वारंग टाकळी येथे ग्रामपंचायतच्या वतिने आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचि जयंती ग्रामपंचायत कार्यालयातील पटांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन सरपंच सौ मायाताई दयाळगीर गिरी यांच्या हस्ते करण्यात आले .व पो पाटील आवधुत कदम, उपसरपंच बालाजी देवकते, तंटामुक्ती अध्यक्ष पांडु देवा आडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष विशाबंर राणे , ग्रामपंचायत सदस्य संगपाल प्रधाने यांनी प्रतीमेचे पुजन केले. श्रि दयाळगीर गिरी यांनी राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांच्या बालपना विषयी व त्यांच्या कामगिरी विषयी माहिती दिली .या वेळी आंगवाडि शिक्षिका पुंजाबाई जाधव, जोतिबाई राणे, कमलबाई हाके, पंचफुला तोकलवाड, पत्रकार दत्ता पोपुलवाड, पत्रकार राम चिंतलवाड, सुधाकर सुकळकर, सेवक वामन गिरी, सुरेश तोकलवाड व सर्व समाज बांधव उपस्थित होते..