दैनिक चालू वार्ता कौठा सर्कल प्रतिनिधी- आनंदा वरवंटकर
कंधार:-राज्य शासन व पशुसंवर्धन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे व सिनर्जीज सोल्युशन प्रा.लि. या कंपनीच्या वतीने जाहिरात न देता व परीक्षा ही न घेता कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकाची बोगस व नियमबाह्य भरती करण्यात आली असुन, ती भरती रद्द करुन नव्याने जाहिरात देवून परीक्षा घेवून तसेच सेवेतील सेवादात्यांना प्राधान्य देवून ही भरती प्रक्रिया पुर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासन व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यात सिनर्जीज सोल्युशन प्रा. लि. या कंपनीस कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक भरतीचे कंत्राट दिले असुन, या कंपनीने २ दिवसापूर्वी कसल्याप्रकारे जाहिरात न देता व परीक्षा ही न घेता पशुधन पर्यवेक्षक पदाची नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने आपल्या मर्जीतील लोकांची पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी भरती केली आहे.
त्यामुळे पूर्वी काम केलेल्यांवर अन्याय झाला आहे. राज्य शासन व पशु संवर्धन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे व संबंधीत सिनर्जीज सोल्युशन प्रा.लि. या कंपनीच्या ना जाहिरात ना परीक्षा या मनमानी पध्दतीने व आपल्याच मर्जीतील पशुधन पर्यवेक्षकांची भरती करुन कोरोना, गोवंशावर नव्याने आलेल्या लम्पी साथरोग व इतर संसर्ग रोगात २०१२ पासून सेवादाते म्हणून कार्यरत असलेल्यांवर अन्याय केला आहे. या सेवादात्याना प्राधाने देण्याची गरज असताना ही सद सिनर्जीज सोल्युशन प्रा. लि. या कंपनीने कोणतीही जाहिरात किंवा परीक्षा न घेता आपल्या मर्जीतील लोकांना पशुधन पर्यवेक्षक म्हणून घेतले आहे. या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पशुसंवर्धन मंत्री, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा संवर्धन उपायुक्त नांदेड यांना देण्यात आले आहे.