दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष वैभव कुमार हाके यांच्या वाढदिवसानिमित्य विविध उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा मंगरूळ व जिल्हा परिषद शाळा पोलिसांनी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्यांचे वाटप करण्यात आले तर लोहा येथील जिल्हा परिषद शाळेत राहणाऱ्या अनाथ विद्यार्थीना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
लोहा शहरातील डॉ हेलन केलर अंध शाळेतील विध्यार्थ्यांना फळे व शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर लोहा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
वृक्ष हि काळाची गरज झाडे लावा झाडे जगवाचा नारा आपल्या जन्मदिनी देत वृक्ष लागवड पण करण्यात आली.
सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असल्याने सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष वैभवकुमार हाके यांना जन्मदिनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
सदरील वाढदिवस अनावश्यक खर्च न कराता अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप , वृक्षारोपण असे विविध सामाजिक कार्यक्रम करुन साजरा केल्याबद्दल लोहा तालुक्यासह जिल्हाभरात टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष वैभव कुमार हाके यांच्या वाढदिवसाची चर्चा सामान्य जनतेतुन ऐकावयास मिळत असुन सर्व क्षेञांतील मान्यवरांनी या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष वैभव कुमार हाके यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.