दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
मुंबई ,ठाणे,नाशिक,अमरावती,अकोला, बीड ,लातुर येथील 14 संघांचा सहभाग.
महाराष्ट्र इनडोअर फुटबॉल असोसिएशन आणि जालना असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारा वर्षाखालील कुमार गट राज्यस्तरीय इनडोअर फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी ( ता.31) भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
चौधरी नगर परिसरातील आर. एन. टर्फ मैदानात आयोजित उद्घाटन सोहळ्यास भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे,भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अतिक खान ,उद्योजक अर्जुन गेही, कृष्णा भुजंग, संजय देठे, फुटबॉल प्रशिक्षक शेख जावेद, असोसिएशनचे राज्य सचिव दीपक निकम, धनराज काबलिये, भागवत बावणे, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शेख मुजाहेद, विकास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
भास्करराव दानवे यांनी आतापर्यंत खुल्या प्रांगणातील फुटबॉल स्पर्धा होत्या तथापि प्रशिक्षक शेख जावेद यांनी पुढाकार घेत इनडोअर फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून नवीन खेळ रुजविण्यासाठी केलेले प्रयत्न अभिनव असल्याचे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
सुञसंचालन अविनाश वाघ यांनी केले तर शेख जावेद यांनी आभार मानले.जालन्यासह राज्यभरातील 14 संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पंच म्हणून शशिभूषण सिंग, अंकुश सिंग, मयुर जाधव, सुरज दुबे हे काम पाहत असून स्पर्धा यशस्वीतेसाठी शेख रफिक, शेख रियाज ,शेख आमेर, उमर रेघीवाले, बब्बू बेग, निलेश वाघमारे, अजमल पाडेला, शेख फईम, शेख जुनेद, अखिब पाडेला, यांच्यासह आर. आर. सी. फुटबॉल क्लब चे सदस्य परिश्रम घेत आहेत. यावेळी स्पर्धक व प्रशिक्षकांची उपस्थिती होती.