दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम-:- ईट- डोकेवाडी या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय कार्यालय येथे निवेदन सचिन थोरात यांनी दिले आहे. सविस्तर वृत्त असे की ईट-डोकेवाडी रस्त्याचे काम चालू असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सदर रस्त्याचे काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले जात नसल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक डोकेवाडी सचिन थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे.रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या खडीवर डांबराचा वापर केला नसून खडी निघून जात आहे. अनेक मोटर सायकल यांचा अपघात होत इजा होत आहे. सदर कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली सचिन थोरात यांनी केली आहे. कामाची चौकशी व कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.