दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- एका महिलेला मयत दाखवून तिच्या मालकीचे शेत तब्बल २ कोटी ७४ लाख २० हजारा मध्ये विकण्यात आले. हा प्रकार माहित होताच कागदोपत्री अमृत दाखविलेल्या त्या महिलेने गाडगे नगर पोलीस स्टेशन गाठले.महिलेच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी १८ जानेवारी रोजी संध्याकाळी चौघांविरुद्ध फसवणूक व फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला.
मौजा तारखेडा येथील ९०आर व मौजा अकोली येथील ०.६९आर जमीन तक्रारकर त्या महिलेच्या सासऱ्याच्या नावाने आहे. ती त्यांच्या सासऱ्याच्या मालकीची जमीन असून सदर महिला देखील वारस असताना चार आरोपींनी संगममत करून कट रचून त्या महिलेला मयत दाखविले.कागदोपत्री मृत दाखवून वारस प्रमाणपत्र तयार करण्यात आले.ते खरे असल्याची भासवून त्या आधारे त्या दोन्ही शेत जमिनींची २.७४ कोटी रुपयांमध्ये परस्पर विक्री करण्यात आली.२७ ऑगस्ट २०२० ते २२ डिसेंबर २०२२ दरम्यान हा प्रकार घडला.याप्रकरणी आरोपी मनोहर संपतराव नाईक (७५,रुक्मिणी नगर),रोशन राजेंद्र नाईक (२८,अकोली),शुभम राजेंद्र नाईक (२८,अकोली),व एक महिला अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.