दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील मौजे गोलेगाव येथील संस्कृती नेमीनाथ डोके जी.प.प्रा.शाळा हिने १४ वर्षाच्या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला असून तिची जिल्हा स्तरीय निवड झाली आहे. उस्मानाबाद येथे दि २० रोजी जिल्हा स्तरीय झालेल्या स्पर्धेत देखील तिने अव्वल स्थान पटकिवले असून विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी तिचे स्थान पक्के झाले आहे. यामुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र गाडे, शिक्षक वर्ग प्रमोद भगत,मनीषा खरपे ,सीमा शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच गोलेगाव शालेय कमिटीचे अध्यक्ष भास्कर डोके,उपाध्यक्ष सादिक शेख, विनोद डोके, अतुल अनभुले, चेअरमन शिवाजी डोके,लक्ष्मण डोके,निवांत अनभुले व अन्य मान्यवरांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ असंख्य उपस्थित होते.