दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
दि 26 जाने खडकवासला पुणे किरकिटवाडी
सिंहगड रोडवरील किरकटवाडी- कोल्हेवाडी येथील ज्ञानज्योती विद्या मंदिर या शाळेत 74 व्या प्रजासत्ताक दिनी लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम यांच्याकडून दोनशेहून अधिक विविध विषयांवरील पुस्तके व ग्रंथ यांचे संच भेट म्हणून देण्यात आले.
शालेय विध्यार्थ्यांचा शारीरिक तसेच बौद्धिक विकास हा अत्यंत महत्वाचा असल्याचे नमूद करून लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी सांगितले की, देशाच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने मुलांना खाऊ वाटप करण्यात येते. यावर्षी आम्ही मुलांना बौद्धिक विकासाला पूरक असणारा पुस्तकरूपी खाऊ देत आहोत.विविध विषयांवरील या पुस्तकांच्या वाचनातून नक्कीच ही मुले पुढे देशाचे एक सुसंस्कृत व परिपूर्ण नागरिक होतील यात शंका नाही. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त करत असताना महेश गायकवाड यांनी संविधानाविषयी माहिती देत विध्यार्थ्यांकडून संविधान प्रस्तावनेचे वाचन करून घेतले. संविधानाने आपणांस दिलेले अधिकार व कर्तव्ये यांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपली प्रगती तर होईलच मात्र आपला देश एका उंचीवर नक्कीच जाईल असेही प्रतिपादन गायकवाड यांनी यावेळी केले.
यावेळी शालेय विध्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.शाळेच्या संस्थापिका वनिता चव्हाण मॅडमने मार्गदर्शनपर विचार मांडले तर मुख्याध्यापिका मनीषा कारले यांनी स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी निरगुडे या विद्यार्थ्यांनीने केले.