दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा शहराला पर्यायी मार्ग व्यवस्था होऊनही दिघी पुणे राष्ट्रिय मार्गावरील सकलप – तोंडसुरे पर्यायी मार्गाचे काम रखडले असल्याने दिघी,बोर्ली,दिवेआगरकडे जाणारी सर्वच प्रकारची वाहन म्हसळा शहर नाक्यावरून रहदारी करीत असल्याने ट्रॅफिक जॅमची समस्या आजही जैसी थे आहे.शहरामधुन एस.टी.सह सर्वच अवजड वाहनांना प्रवेश बंदी करूनही वाहतूक कोंडी समस्या वाढतच असल्याने होणारी कोंडी कमी करण्यासाठी म्हसळा पोलीस ठाणे येथे पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेची मिटिंग घेऊन संवाद साधला.मिटिंगला रिक्षा चालक मालक यांना पी.आय.सोनावणे यांनी वाहतुकीचे नियमांबाबत व वाहतुकीची कोंडी होणार नाही याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.मिटिंगमध्ये शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेचे बहुतांश मंडळी उपस्थित होते.