दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथे कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील सद्गुरू श्री. संत बाळूमामा देवालय समाधी मंदीर आहे. संत बाळूमामाच्या यांच्या 18 पालख्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, या राज्यात संचार करीत आहे. संतसदगुरू बाळूमामाच्या 18 पालख्यातील 1 नंबरची पालखी सोमवार दि.27 फेब्रुवारी 2023 रोजी केहाळ वडगावमध्ये मुक्कामी आहे. पालखी सोहळ्यासाठी कोणी मालक, चालक, नोकर कोणीच नसून फक्त सद्गुरू संत बाळूमामा यांची सेवा करणारे सेवक व भक्त हे पुर्णपणे आपली श्रध्दा ठेवून बाळूमामा ची सेवा, मेंढ्यांची सेवा करत असतात. जो बाळूमामाचा भक्त पुर्णपणे भक्तीभावाने खरी खुरी सेवा करतो त्यालाच सदगुरु श्री बाळूमामा यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
केहाळ वडगाव येथे बाळूमामा महाराजांच्या संस्थानात बाळूमामा यांच्या पालखी व मेंढ्यांचा मुक्काम आहे. मेंढ्यांसोबतआठ ते दहा माणसं भक्तगण हे अनुभवी आहे.येथे बाळूमामा ची पालखी जो पर्यत आहे तो पर्यत अन्नपाणी, आदीसेवा केहाळ वडगावचे चे गांवकरी व कार्यकर्ते देण्यासाठी तयार असून भक्तीभावाने देत आहेत. सदगुरु बाळूमामा च्या मेंढ्यांचा मुकाम हा एकाच ठिकाणी सात ते आठ दिवस असतो, त्यामुळे त्या क्षेत्रातील पंचक्रोशीतील भक्त, भाविक बाळूमामा यांच्या मेंढ्या बघण्यासाठी व दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. संत सदगुरु बाळूमामा यांच्या पालखीचे व बाळूमामा मूर्तीची आरती ही सकाळ 09वाजता , संध्याकाळी 8:30वेळेस होते आणि आरती झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.