दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील मौजे धारासूर येथील गुप्तेश्वर मंदीर जर्नोध्दार प्रस्तावास मंजूरीसाठी चालु असलेल्या अर्थसंकप्लीय अधिवेशनामध्ये मंत्री मंडळाच्या कॅबीनेट साठी शिफारस
करुन शासन निर्णया नुसार मंजूरी घेवून अर्थसंकल्पीय बजेट मध्ये निधी मंजूर करुन घेणे बाबतच्या मागणीचे निवेदन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना धारासुर ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.
मौजे धारासूर ता. गंगाखेड जिल्हा परभणी येथील गुप्तेश्वर मंदीर जर्नोध्दार प्रस्ताव मंजूरीसाठी पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासनाने उपसचिव पर्यटन व सांस्कृतीक कार्यविभाग मंत्रालय मुंबई येथे मंजूरीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावास गुट्टे यांनी मार्च 2022 च्या अधिवेशनात व डिसेंबर 2022 च्या नागपुर येथील अधिवेशना मध्ये तारांकित प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजारोहण कार्यक्रमानंतर धारासूर येथील गुप्तेश्वर मंदीर जिर्णोध्दार निधी मंजूरी विषयी घोषणा केलेली आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिनांक : 27/12/2022 रोजी आमदार गुट्टे यांनी मांडलेल्या लक्षवेधीस उत्तर देताना सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन महिन्याच्या आत गुप्तेश्वर मंदीर जिर्नोध्दार निधीस मंजूरी देवून प्रस्तावास विभागाकडे वर्ग करु असे सांगितलेले आहे.
तरी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,सांस्कृतीक मंत्री यांना व संबंधीत मंत्री महोदयांना कॅबीनेट मध्ये मंजूरी घेण्यासाठी शिफारस करून अर्थसंकल्प बजट मध्ये सांस्कृतीक कार्य विभागाचा निधी पुरातत्व विभागाकडे वर्ग करुन गुप्तेश्वर मंदीराचा जिर्नोध्दार करुन घ्यावा.
असे निवेदन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना
समस्त गावकऱ्यांच्या वतीने निवृत्ती विठ्ठलराव कदम मौजे धारासूर ता. गंगाखेड जि.परभणी यांच्या मार्फत देण्यात आले आहे.