दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी- समीर मुल्ला
कृषी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस , उद्धव ठाकरे गट शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने विजय होत कृषी बाजार समिती वर एक हाती सत्ता मिळवली तर भाजप व शिंदे गट शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलला ७ जागा वर समाधान मानवे लागले भाजपचे तुळजापूर मतदार संघाचे आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या ताब्यात असलेले कृषी बाजार समितीवर महाविकास आघाडीने विजय मिळवित भाजप व शिंदे गट शिवसेनेला धक्का मानला जात आहे
कळंब कृषी बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी १८ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शुक्रवारी(दि. २८) रोजी मतदान होवून ९५.५८ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी (दि.२९) रोजी तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीच्या मध्ये सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम ग्रामपंचायत नंतर सोसायटी गटाचे, हमाली मापारी, व्यापारी गटांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी पंकज शिंदे यांनी निकाल घोषित केला. महाविकास आघाडीचे उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर कळंब- उस्मानाबाद मतदार संघाचे आमदार कैलास पाटील कळंब तालुका प्रमुख शिवाजी कापसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख श्रीधर भवन, काँग्रेस पक्षाचे तालुकाप्रमुख पांडूरंग कुभांर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल तर भाजपचे आमदार राणाजगजीसिंह पाटील शिंदे गट शिवसेनेचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे पदाधिकारी निवडणूक रिंगणात उतरले होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर करताच महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आदेश बाजी करत निकालाचे स्वागत करून जल्लोष केला.
चौकट
सोसायटी गट
१) हनुमंत आवाड (४१०)
२) शिवाजी कापसे (४५२)
३) कल्याण टेकाळे (४०७)
४) विलास पाटील (४०४)
५) विकास बारकुल (४०४)
६) श्रीधर भवर (४३४)
७) संदीप मडके ((४०८)
महिला राखीव मधुन
८) सुजाता वाघमारे (४३३)
९) सुनिता शेळके (४४५)
इतर मागासवर्गीय गटातुन
१०) हरिभाऊ कुंभार (४६३)
भटक्या विमुक्त जमाती गटातून
११) भारत सांगळे (४५५)
ग्रामपंचायत गट
सर्वसाधारण गटातून
१२) अशोक टेळे ( ४१४)
१३) अनंत लंगडे (४१४)
अनूसूचित जाती जमाती गटातून
१४) रामकिसन कोकाटे (४०४)
आर्थिक दुर्बल गटातुन
१५) अरुण चौधरी (४१४)
व्यापारी गट
१६) लक्ष्मण कोल्हे (४१३)
१७) रोहन पारख (४०१)
हमाल मापाडी गटातून
१८) शिवाजी आडसुळ (१२४)
हे उमेदवार विजयी झाले आहेत