दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी:-किरण गजभारे
मोटरसायकल वरुन वेगाने दोघे जात असताना ,पुलावर बसलेल्या वानराने अचानक मोटरसायकल वर उडी मारली यात दोघेही खाली पडल्याने मोटरसायकल चालक जागीच ठार झाला तर मागे बसलेल्या एकाला हेल्मेट असल्याने गंभीर जखमी झाला आहे.हि घटना तालुक्यातील राजापूर पाटी जवळ दि.१ मे २०२३ रोजी घडली.
धर्माबाद शहरातील अभिषेक होमबहादुर तमु (रा. केशवनगर ,किशनगड अजमेर, ह.मु. धर्माबाद) व कृष्णा बाबुशा शेळके ( रा.शांतीनगर धर्माबाद हे दोघे खाजगी कामानिमित्त धर्माबाद हुन राजापूर मार्ग नांदेड ला मोटरसायकल क्रंमाक RJ425G5829 वरुन जात होते.राजापुर
पाटीजवळील पुलावर बसलेल्या वानरानी अचानक यांच्या मोटरसायकल उडी मारली,यात दोघेही जबर खाली पडले, चालक अभिषेक होमबहादुर तमु यांच्या पाठीमागे डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला तर मागे बसलेला कृष्णा बाबुशा शेळके यांने डोक्याला हेल्मेट लावले होते म्हणून डोक्याला मार न लागता छातीला पायाला लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.कृष्णा शेळके याला निझामाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले.तर अभिषेक तमु यांचें श्वइच्छेदन करून नातेवाईक च्या ताब्यात दिले, नातेवाईकांनी त्यांवर अंत्यसंस्कार केले.
अभिषेक तमु हा धर्माबादेत गेल्यावर्षी पासुन फरशीचे दुकान टाकला होता.तो आई वडील चा एकुलता एक मुलगा होता.अभिषेक हा अविवाहित असुन आई वडील ला आधार देणारा मुलगा गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सायलु मकलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक वाडेकर करित आहेत.