दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षीण मतदार संघातील मौजे हरसद येथील नागरिकांना कायम स्वरुपी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड दक्षिण चे कार्यसम्राट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या 77लक्ष रुपयांच्या कामाचा दि.5 मे रोजी २०२३ रोजी आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ कालिदास मोरे लोहा नगर परिषद चे गट नेते पंचशील कांबळे येवले पिंपलगावचे उपसरपंच दयानंद येवले,ढगे पिंपलगावचे सरपंच बालाजी ढगे हरसदच्या सरपंच सौ पार्वती काकु जामकर उपसरपंच वंदना संजय भालेराव हभप एकनाथ महाराज उप अभियंता डिकले साहेब शाखा अभियंता येरूकर साहेब गुत्तेदार संतोष फाजगे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे रिपाइं चे जिल्हा सरचिटणीस संजय भालेराव ग्रामपंचायत सदस्या सौ मिरा आलट मुरली पाटील आलट माऊली आलट पुंडलिक लाडाणे नागनाथ ठाणेकर भरत ठाणेकर मारोती आलट सटवा जामकर सुदाम आलट बाबुराव जाधव शाम जाधव गोविंद पवार संदिप लाडाणे माधवराव लाडाणे कैलास गायकवाड बंडु महाराज जाधव दामाजी ठाणेकर गंगाधर देवरकुंडे जळबा चिलके प्रशांत लाडाणे भिमराव भालेराव यांच्या सह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना आ.मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले की हरसद येथील नागरिकांना कायम स्वरुपी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून हर घर जल या प्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 77लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असुन या कामाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो व सदरील कामे ही दर्जेदार झाले पाहिजे .
मी या गावचे आभार मानतो या गावाला एक सुशिक्षित नेतृत्व संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे व रिपाइं चे जिल्हा सरचिटणीस संजय भालेराव हे मिळाले त्यामुळे गावाचा विकास होत आहे. तसेच या भागाचा भूमीपुत्र शेतकऱ्यांचा पुत्र ते गावांसाठी मेहनत घेत आहेत.
मराठवाड्याचा व महाराष्ट्राचा विकास चव्हाण परीवारांनी केला आहे. ३२३७ धरणे कै. शंकरराव चव्हाण यांनी बांधले आहेत त्यामुळे महाराष्ट्राची तहान भागली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा विकास केला आहे. त्यांचे सभागृहात भाषण असेल तर सर्वजण शांत बसून ऐकतात त्यामुळे बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी रहा . मी शेतकऱ्यांचा पुत्र आहे. माझा फोन माझ्या जवळ असतो पि.ए.जवळ नसतो कुणीही फोन लावला तर त्यांचा फोन उचलून कामे करतो.
गावातील मुख्य रस्त्यावर सि सि, स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता सि सि स्मशानभूमी परिसरात सुशोभीकरण, अण्णाभाऊ साठे सभागृहा ला कंपाऊंड वॉल, समाजमंदिर परिसरात प्लेवर ब्लाक स्मशानभूमी ते एकनाथ महाराज घराकडे जाणारा रस्ता आदी मागण्या आल्या आहेत ते सर्व कामे निश्चित पणे केले जातील तसेच हरसद येथे विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आमदार मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले.