दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार: जव्हार शहरात यशवंत नगर मधील नालंदा बुद्ध विहार येथे बुद्ध जयंती निमित्त बुध्द मूर्तीची प्रतिष्ठापना शेकडो अनुयायी व बौद्ध भिखुंच्या उपस्थितीत विधिवत करण्यात आली.या वेळी बुध्द मूर्तीची मिरवणूक ही ट्रॅक्टर सजवून विजय स्तंभ ते राजे यशवंतराव मुकणे महाराज चौक येथे वळसा घालून काढण्यात आली.बुद्ध पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंती.बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव आहे.हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.हा दिवस गौतम बुद्धांची जयंती आणि त्यांचा निर्वाण दिवस देखील आहे.भगवान बुद्धांना या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली.
बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन,जपान,व्हियेतनाम,थायलंड,भारत,म्यानमा,श्रीलंका,सिंगापूर,अमेरिका,कंबोडिया,मलेशिया,नेपाळ,इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.या विधिकरिता बौद्ध बांधव भगिनींनी पांढरे वस्त्र परिधान केले होते,भन्ते महानाम,भन्ते वफ दादर यांनी पूजाविधी पार पाडला,गोविंद बल्लाळ,वसंत धांडे,सागर बल्लाळ,महेंद्र जाधव व भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा येथून भालचंद्र गायकवाड,अरुण जगताप तर संत रोहिदास चर्मकार आयोग महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य विनीत मुकणे यांची विशेष उपस्थिती लाभली.जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी मोलाचे सहकार्य केले.