दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यामातून आरोग्यसेवा राबविल्या जातात. या आरोग्य सेवा शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी , महानगरपालिका स्तरावर आरोग्यवर्धिनी केंद्राची औपचारिकरित्या सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र तथा कामगार दिनी १मे २०२३ ला चंद्रपूर महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतीक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग निधी व महिला कल्याण निधी अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेतर्फे मंजूर लाभार्थ्यांना कर्ज वितरण पत्र तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शासन आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्नात असुन महात्मा फुले जन आरोग्य सेवेचे विमा संरक्षण हे दीड लाखांवरून पांच लाखांपर्यंत वाढविण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या उद्घाटन पर भाषणातून दिली.याप्रसंगी मंचावर आयुक्त डॉ विपीन पालिवाल ,माजी उपमहापौरद्वय राहुल पावडे, अनिल फुलझेले , माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.