दैनिक चालु वार्ता चाकुर तालुका प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
चाकुर: लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुधाकर तुकाराम शृंगारे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले.
आपल्या कर्तव्याप्रती सजग असणारे लोकप्रतिनितीधी म्हणून परिचित असणारे लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नेहमी चर्चेत असतात. सामाजिक, शैक्षणिक राजकिय, अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे. लातूर च्या वैभवात भर म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 75 फूट स्टॅच्यू ऑफ नॉलेज उभारणी, समतानानायक महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या विषय, छत्रपाती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लेझर शो, लातुरात पुस्तकातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारून देशात रेकॉर्ड निर्माण केले. लोकसभेत आपल्या मतदार संघातील असंख्य प्रश्न मांडून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जातीपातीच्या भिंती तोडून सर्व धर्म समभाव जपणूक करून जनसामान्य व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले खासदार सुधाकर शृंगारे यांचा वाढदिवस चाकुर, चापोली येथे पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून पत्रकार सुशिल वाघमारे द्वारा साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ वाघमारे, प्रा. अ. ना. शिंदे, मधुकर कांबळे, विकास स्वामी,संग्राम वाघमारे, दत्तात्रय बेंबडे, संजय पाटील चाकूरकर, दीपक पाटील रामेश्वर पाटील,गौतम माने,उत्तम माने , प्रा बालाजी कांबळे, दयानंद वाघमारे, नारायण हणमंते प्रकाश सिरसाठे, विशाल सूर्यवंशी, आकाश सरकाळे आरोग्य कर्मचारी डॉ राम नरवटे आदी जन उपस्थीत होते