दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांनी कारवाईसाठी आलेल्या महसुल पथकाला पाहून पळून जाण्याचा प्रयत्नात वाळूची ट्रॉली पलटी झाल्यानंतरही सहकार्याच्या मदतीने नायब तहसीलदाराला धमकावत ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन पसार झाला. ही घटना ता. ५ मे रोजी दुपारी उस्वद ( ता. मंठा ) शिवारात घडली .
जालना जिल्ह्यात नवीन धोरणानुसार वाळू लिलाव प्रक्रिया कडे लिलावधारकांनी दुर्लक्ष केले. परिणामी , एकही वाळू डेपो सुरू झाला नाही. त्यामुळे चोरट्या मार्गाने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होतांना दिसत आहे. त्यांतच अवैध वाळू वाहतूकीला प्रतिबंध करतांना महसूलच्या अधिकारी – कर्मचा-यांना वाळू माफियांच्या रोषाला कसं सामोरे जावे लागत असल्याचे कारवाई दरम्यानचा व्हायरल व्हिडिओमधुन समोर आले.
मंठा तालुक्यातील उस्वद येथुन पुर्णा नदीपात्रातून अवैध वाळू ट्रॅक्टरमधुन वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांनी कारवाईसाठी आलेल्या महसूलच्या पथकांला न जुमानता माळरानांवरील खडतर रस्त्याने भरधाव वेगाने व निष्काळजीपुर्वक पळून जाण्याचा प्रयत्नात वाळूची ट्रॉली उलटली. तर वाळूसह ट्रॉली घटनास्थळी सोडून सहकार्याच्या मदतीने पथकातील नायब तहसीलदार प्रवीण देशमुख , तलाठी रविंद्र पुल्लागोर , नितीन चिंचोले व कोतवाल राजेंद्र चिंचाणे यांना धमकावत ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन वाळूमाफिया पसार झाला. याप्रकरणी नायब तहसीलदार प्रवीण देशमुख यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक गजानन भास्कर जाधव रा. उस्वद व अन्य विरुद्ध कलम २७९ भादवी सह कलम ३ व ४ गौण खनिज अधिनियमयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल …
अवैध वाळू प्रतिबंध पथकातील नायब तहसीलदार प्रवीण देशमुख यांनी जीव धोक्यात घालून ट्रॅक्टरचा पाठलाग करताना दिसुन आले. ट्रॅक्टर चालकांनी नायब तहसीलदारासमोर चालू ट्रॅक्टरमधून ट्रॉली हायड्रोलिक करत वाळू रिचवण्याचा प्रयत्नात वाळूची ट्रॉली उलटली . विशेष म्हणजे, या वाळू माफियाविरुद्ध आठवड्यापूर्वी व अनेक गुन्हे दाखल आहेत .
वाळू माफियांना तहसीलदारांचा धाक …
मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांना अवैध वाळू वाहतूकीला ९५ % प्रतिबंध घालण्यात यश आले. सर्वाधिक वाळू माफियाविरुद्ध कारवाई केल्यामुळे वाळू माफियांना तहसीलदारांचा धाक दिसून येत आहे.