दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत २०२३ या वर्षातील शिक्षकांच्या बदली प्रकरणात स्वतःच्या सोयीनुसार बदली व्हावी व बदली प्रकरणात सुट मिळावी यासाठी काही शिक्षक महाशयांनी वैद्यकीय अधिकाऱ्याकडुन दिव्यांग नसताना दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेतले व सदरचे प्रमाणपत्र बदलीच्याच कारणास्तव जि.प.प्रशासनाकडे वेद्यकीय मंडळाच्या माध्यमातुन दाखल केले,ज्यामुळे बदली प्रक्रीयेत सोयीनुसार बदलीचे ठीकाण मिळण्याचा मार्ग अवैधरीत्या मोकळा होताना दिसुन येत आहे.
याबाबत काटकळंबा ता.कंधार येथील जि.प.हायस्कुलचे शिक्षक श्री.बळीराम रामराव मुद्देवाड यांनी मा.मुख्यकार्यकारी
अधिकारी जि.प.नांदेड यांच्याकडे सबळ पुराव्यानिशि रितसर तक्रार दाखल केलेली
असुन याबाबत बदली प्रक्रीयेपुर्वी चौकशी करून
संबंधीत
बोगस बदलीधारक शिक्षकावर कार्यवाही करावी व दिव्यांगाचे खोटे दाखले देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत
असे निवेदनात नमुद केलेले आहे.
२०२१ पासुन आपसी बदली प्रक्रीया बंद करून मा.मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड यांनी बदली प्रक्रीयेत पारदर्शकता आणली असुन शिक्षकांना या प्रक्रीयेत प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न असताना काही महाठग शिक्षकांनी चोर मार्गाचा अवलंब करून शिक्षण विभागाची अब्रु वेशीला टांगण्याचा प्रकार पहायला मिळत आहे.
अर्धापुरे सतिष बसप्पा
( माध्य.शिक्षक ईतवारा,नांदेड )
सेवलीकर संजय उत्तमराव ( माध्य.शिक्षक लहान,अर्धापूर )
हे वरील दोनही शिक्षक सन २०२१ व २०२२ या शैक्षणिक कार्यकाळात सेवाज्येब्ठता यादीनुसार दिव्यांग असल्याबाबत कसलीच नोंद दिसुन येत नाही,परंतु
२०२३ च्या बदली प्रक्रीयेत पेसा अंतर्गत किनवट तालुक्यात बदली होऊ नये
म्हणुन हेच शिक्षक दिव्यांग नसताना दिव्यांग असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याकडुन खोटा दाखला मिळवला ज्यामुळे उद्याच्या बदली प्रक्रीयेत सोयीनुसार बदली करून घेण्याचा डाव दिसुन येत आहे.
वरील शिक्षकांनी दिव्यांगाचा दाखला मिळवला तो केवळ आणी केवळ सोयीस्कर बदलीसाठीच.त्यांच्या
दिव्यांग दाखल्याची नोंद त्यांच्या सर्विस बुकला का केली गेली नाही ?, दिव्यांगाचा भत्ता का स्वीकारत नाहीैत ? याबाबत पुर्नत:हा शंका असुन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा खोटया दिव्यांग शिक्षकांच्या सर्विसबुकची गांभिर्याने चौकशी व पडताळणी करणे कायम गरजेचे आहे.
जि.प.अंतर्गत बदली प्रक्रीया ही येत्या ११.५.२०२३ रोज गुरुवारी पार पडत असल्याचे समजते
परंतु अशा महाठग शिक्षकांना शोधुन त्यांच्यावर कार्यवाही होणे ही काळाची गरज आहे,
बदलीस पात्र असलेल्या शिक्षकाला अवैधरित्या ईतरत्र फेकल्या जाईल व राजकीय वरदहस्त असलेल्या व शिक्षण विभागाला काळीमा फासणाऱ्या या ठगांची मनाप्रमाणे, सोयीनुसार बदली होईल असे न होता नांदेड शिक्षण विभागाने तात्काळ अशा बोगस बदलीधारक शिक्षकांची व वैद्यकीय दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यासह बदलीप्रक्रीये पुर्वी चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आदेशित करावे व शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात होणाऱ्या बोगस बदलीला २०२३ च्या बदली प्रक्रीयेतुन बाद करावे असे तक्रार निवेदनातुन मागणी केल्याचे दिसुन येत आहे,
या निवेदनाच्या प्रति
मा.शिक्षणाधिकारी
( प्रा.व मा. ) नांदेड.
यांना देण्यात आलेल्या आहेत.