दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा.दवणे.
मंठा वैशाख पौर्णिमा हा दिवस जगभरात सण म्हणून साजरा केला जातो.या दिवशी तथागत गौतम बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती,महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या आहेत.शांततेचे प्रतीक मानवतेचा संदेश जगातील सर्व दुःख संपवण्यासाठी गौतम बुद्धांनी या जगाला मार्ग दाखवले. दुःखाचे मूळ नाहीसे करण्याचा एकमेव मार्ग, पंचशील पालन, आर्य अष्टांगित मार्ग, दहा पारमिता चार आर्यसत्य असल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख वक्ते उपस्थित भास्कर साळवे उपस्थित बौद्ध अनुयायांना संबोधित करताना म्हणाले. बुद्ध पौर्णिमा निमित्ताने मंठा शहरातील तमाम बुद्ध उपासक उपासिका यांनी श्वेत वस्त्र परिधान करून, वंदन गीत बुद्ध रूपाचे रथामध्ये ठेवून भव्य मिरवणूक शांततेमध्ये काढण्यात आली “जग मे बुद्ध का नाम है यही भारत की शान है”या घोषवाक्य पंचरंगी ध्वज हाती घेऊन लहान बालक, वयस्क, तरुण उपासक उपासिका धम्म रॅलीमध्ये सहभागी झाले, धम्म रॅली मुख्य मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकांमध्ये ए.जे. खरात यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजारोहण तर बाबासाहेब इंगळे यांच्या हस्ते बुुद्ध रूपाचे पूजन करण्यात आले .
रॅलीचे रूपांतर धम्मदेसनेत होताच उपस्थित उपासकांना मार्गदर्शन करताना साळवे म्हणाले की, संपूर्ण जगाच्या इतिहासात आजारामर होणारे, महान विचारांनी आणि शिकवणीने जगाला एक नवीन मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करून अनेक जीवनात यशस्वी झाले त्यांच्या मनात समाजासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली. भगवान बुद्ध म्हणतात मी मार्ग देत आहे मोक्षदाता नाही असे साळवे म्हणाले. यावेळी पंचशीला बुद्ध पूजा परित्राण पाठ सूक्त पठण करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे स्पर्धकांचा गुणगौरव स्मृतिचिन्ह देऊन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी नगरसेवक अरुण वाघमारे राजेश खंदारे, बाळासाहेब वांजोळकर, ॲड सिद्धार्थ अवसरमोल, अशोक अवचार, गंगाराम गवळी,सुरेश वाव्हळे, अध्यक्ष शरद मोरे, विष्णू वाघमारे, ॲड अनिल मोरे, ॲड सुमेध आवारे, महेंद्र टेकुळे,भगवान वाघ ,अजय मोरे ,कुंडलिक वाघ, बी.के प्रधान, कॉ सचिन थोरात, आसाराम चोरमारे, संतोष ठाकरे, भीमराव वाघ , महेंद्र मोरे, प्रदीप मोरे यांच्यासह समस्त बौद्ध उपासिका सारनाथ युथ चे सर्व सदस्य यांची उपस्थिती संदेश प्रधान सनी पंडित आकाश जाधव करण वटाणे विजय चव्हाण यांनी श्रम घेतले उत्कृष्ट संचलन शुभम अंभोरे यांनी केले.