दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
. नांदेड – श्री शिवाजी विद्यालय दिग्रस बु.च्या शैक्षणिक वर्षे 2001- 2002 च्या दहावीच्या वर्गमित्रांचा तब्बल एकवीस वर्षानंतर नांदेड येथील हॉटेल मंजू पॅलेस येथे 7 मे 2023 रोजी स्नेहमेळावा संपन्न झाला. 1992 ते 2002 या कालावधीत पहिली ते दहावीचे दहा वर्ष एकत्र शिक्षण घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात रमलेल्या मित्रांचा स्नेहमेळावा झाला. या स्नेहमेळाव्यात त्या वेळेसच्या पाचवी ते दहावी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.जे शिक्षक ,विद्यार्थी हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना , आज तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी आहात पण शाळेतल्या मित्राशी नाळ मात्र तशीच जपत आहात हेच तुमचे सर्वात मोठे यश आहे, इथून पुढेही असाच ऋणानुबंध जपावा.असा मोलाचा सल्ला दिला. बऱ्याच वर्षानंतर झालेल्या सन्मानाने सर्वच शिक्षक भावूक झाले होते.या मेळाव्याचे नियोजन तब्बल चार महिन्यापासून चालू होते. सतीश सोपानदेव यानभुरे (जि.प.शिक्षक राजगुरूनगर, पुणे) , शिला प्रल्हाद भुरे , मारोती गवळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले ,कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. संदिप शंकरराव कांबळे (सहशिक्षक श्री शिवाजी विद्यालय ,कंधार) यांनी सूत्रसंचालन केले. ‘मित्र वणव्यामधे गारव्यासारखा’ ही कविता त्यांनी त्यांच्या सुरेल आवाजात सादर केली. सचीन बिजले यांनी नितीन देशमुख यांची कविता ‘डाळिंबाच्या ओठावरती कडुनिंबाची गाणे’ ही कविता सादर केली. रोहिदास जाधवने शाळकरी वयात सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेले ‘दिल दीवाना’ या गाण्यावर पुन्हा एकदा नृत्य सादर केले.सतिश यानभुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.’मित्रासाठी थोडासा वेळ काढ’ आणि ‘गुरू तुमच्यामुळे’ या स्वलिखीत कविता सादर केल्या.सतीश सोपानराव यानभुरे यांचे ‘धुळधान’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाल्यामुळे त्यांचा सर्व शिक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्वांसाठी उत्कृष्ट अशा सुरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या मेळाव्यासाठी पि.एस.भुरे, एस.व्ही.पवळे , व्हि.एन चोले, एस.टी.कांबळे, टि.आर. कारागीर ,ए.बी. गुट्टे ,बि.डी होणराव, डि.एन.नवघरे हे शिक्षक तसेच व्यंकट तेलंग,सादिक तांबोळी , भरत गोरे हे उपस्थित होते. या स्नेहमेळाव्यासाठी शिला भुरे,अर्चना केंद्रे ,सुरेखा जोगपेटे ,अनुराधा बनसोडे ,शाईन तांबोळी,सुजित गोरे, राम कांबळे, शिवकुमार होणराव,संदिप होणराव,फारेश बागवान, यांचे विशेष सहकार्य लाभले.सर्वच विद्यार्थी उपस्थित होते. खुप वर्षानी भेटून सर्व वर्गमित्र भावुक झाले होते व सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद कोसळून वाहत होता