दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा : उपरोक्त विषयी निवेदन करण्यात येते की संपूर्ण निलंगा तालुक्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना प्रशासन नोटीसा देऊन गायरान जमिनीवरील लाभार्थ्यांना अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करत आहे ते अतिक्रमण काढण्यात येऊ नये व हे लाभार्थी आतापर्यंत 50 ते 40 वर्षे झाले गायरान जमिनीवरतीच वास्तव्यात आहेत त्या लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे नोटीसा देऊन किंवा शासकीय बळाचा वापर करून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करू नये व या लाभार्थ्यांना गायरान जमिनी वरती उठून त्यांचे संसार उघड्यावरती आणू नयेत व अतिक्रमणधारकांना आपण नोटीसीद्वारे अनेक प्रकारचे निकष लावून दिलेले आहेत त्यामुळे सर्व लाभार्थी हे हावला दिवल झालेले आहेत व मानसिक त्रासामध्ये आहेत त्यामुळे प्रशासनाने कुठल्याही गायरान जमिनीवरील धारकांना अतिक्रमण करण्यासाठी तगादा लावू नये किंवा नोटीसा देऊ नये अन्यथा येणाऱ्या 15 /5 /2023 रोजी ठीक सकाळी 11:30 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालय निलंगा येथे छावा करणार धरणे आंदोलन..
या आंदोलनात निलंगा तालुका अध्यक्ष दास(भैया) साळुंके निलंगा तालुका अध्यक्ष छावा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लाभार्थी तसेच छावे करणार आंदोलन.