दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : कृषि विभाग पंचायत समिती,तालुका कृषी विभाग व तालुका कृषी साहित्य विक्रेता संघ यांच्या वतीने काठीपूरा येथील बालाजी मंदिर हॉल अंजनगाव सुर्जी येथे प्रभारी कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार यांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न झाली.
या खरीप हंगाम बैठकीदरम्यान रासायनिक खताबद्दल व पोज् मशीन,खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणे याविषयी मार्गदर्शन तसेच साहित्य विक्रेत्यांना येणाऱ्या खरीप हंगाम संबंधी कृषी अधिकारी राजकुमार अडगोकर यांनी महत्वाच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.तसेच पंचायत समिती अंजनगाव सुर्जी कृषी विभागाचे अश्विन राठोड सुद्धा सर्व कृषी विक्रेता दुकानदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आणि रासायनिक खते,बी बियाणे तसेच कीटकनाशके यांच्या विक्री बद्दल मोलाची माहिती सांगितली.
सदर खरीप हंगाम बैठकीला तालुका कृषी साहित्य विक्रेता संघ अध्यक्ष तथा नरसिंग कृषी सेवा केंद्र संचालक जगदीश सारडा,वर्षा कृषी सेवा केंद्राची संचालक राजू जोहरापूरकर,देशमुख कृषी सेवा केंद्र संचालक प्रदीप देशमुख,रोहित अग्रो एजन्सीजचे संचालक सुधाकर टिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी साहित्य विक्री त्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी तालुक्यातील जवळपास ८० दुकानदार उपस्थित होते.दुकानदारांच्या समस्या कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या आणि निराकरण सुद्धा यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाची सांगता कृषी अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व दुकानदारांना शुभेच्छा देऊन करण्यात आली तर संचालन व आभार प्रदर्शन अमोल घोगरे यांनी केले.