दैनिक चालु वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी –
बीड/अंबाजोगाई
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर महसूल मंडळातील शेतकरी 2022 खरीप हंगाम सोयाबीन (soyabin ) पिकाच्या अनुदानापासून शेतकरी वंचित असून वेळोवेळी निवेदन देऊनही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन तारीख नऊ शुक्रवार रोजी पासून उपोषणाला बसले आहेत.
पाटोदा ममदापूर महसूल मंडळात गेल्या खरीप हंगाम 2022 मध्ये पावसाची उघडदीप येलो मोझ्याक अतिवृष्टी यामुळे सोयाबीन सह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते या या पाटोदा ममदापूर महसूल मंडळात सोयाबीन शेती शेतकऱ्यांच्या हातून गेली होती तरीही हे शेतकरी खरीप हंगाम 2022 सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले आहेत महाराष्ट्र शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये अनुदान जाहीर केले होते मात्र अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर महसूल मंडळ या अनुदानापासून वंचित आहे. खरीप हंगाम 2023 च्या पेरणीचा वेळ आली आहे तरीही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याने रवींद्र ढगे ,केशव नाना ढगे, अण्णासाहेब साबळे ,उमेश ढगे आधी शेतकऱ्यांनी नऊ जून शुक्रवारपासून उपोषण चालू केले,
उपोषणाला पाठिंबा व मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात व शेतकऱ्यांना न्याय द्यावे अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा उपोषण स्थळी मा. उपसभापती श्री तानाजी देशमुख यांनी दिला.