दैनिक चालू वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी-
बीड/अंबाजोगाई
माजलगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.अली साहेब यांच्या न्यायालयाने आरोपी महेश काशिनाथ कोकरे यास दोन हजार रुपये लाच स्वीकारल्याच्या आरोपात जामीनवर मुक्त केले,आरोपीतर्फे अँड.आर.एम.धायगुडे यांनी काम पाहिले.
प्रकरणातील आरोपी महेश काशिनाथ कोकरे धारूर तहसील मध्ये महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत असताना लिंगायत समाजाची समशानभूमीची नोंद करणे बाबतचे चौकशी प्रकरणाचे निकाल पत्र तयार करून मा.तहसीलदार धारूर यांची सही घेऊन देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली व ती स्वीकारली अशा आशयाचे आरोप करत फिर्यादीने फिर्याद दिल्यावरून धारूर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गु.र.क्र.170/2023 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंद होऊन आरोपीस अटक करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड. आर.एम.धायगुडे यांनी काम पाहिले तर त्यांना अँड.जी.डी. कांदे,अँड.डी.ए. लोंढाळ, अँड.एस.एन. रुपनर,अँड.अविनाश धायगुडे यांनी सहकार्य केले….