दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
गावकऱ्यांना वेटीस धरून के टी एलच्या खडी क्रेशर मशीनला लाईट पुरवठा करणाऱ्या इंजिनिअर जांभुळणेवर कारवाई करा गावकऱ्यांची मागणी
लोहा तालुक्यातील कारेगाव ३३ उपकेंद्रा अंतर्गत एकुण २२ गावांना विद्युत पुरवठा केला जातो. कारेगाव ३३ उपकेंद्रात ५ wpm विद्युत पुरवठा आहे तरिपण २२ गावांना व्यवस्थित विद्युत पुरवठा केला जात नाही. २२ गावांना विद्युत पुरवठा करण्याऐवजी त्या गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात वेटीस धरुन इंजिनिअर रुषीकांत जांभुळनेनी मोठा आर्थिक व्यवहार करुन केटीएल कंपणीच्या साईबाबा खडी क्रेशरला विद्युत पुरवठा केला आहे. अशा भष्ट्राचारी इंजिनिअर जांभुळनेवर कार्यवाही करावी व कारेगाव येथील ३३ उपकेंद्रात अंतर्गत येणाऱ्या २२ गावचा लाईटचा गंभीर झालेला प्रश्न सोडवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
तत्कालीन इंजिनिअर शिवाजी वाघमारे यांनी साईबाबा खडी क्रेशरला विद्युत पुरवठा करण्यासाठी परवानगी नाकारली होती. विद्युत पुरवठा नोट पॉसिबल म्हणून कार्यालयालाही कळवले होते पण त्यानंतर तेथे इंजिनियर म्हणून रुजू झालेले ऋषिकांत जांभूळणे यांनी के टी एल कंपनी यांच्याशी मोठा आर्थिक व्यवहार करत लाईट पुरवठा करून दिला यामुळे कारेगाव ३३ केव्ही उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या २२ गावांना भर उन्हाळ्यामध्ये लाईटचा त्रास सहन करावा लागत आहे ३३ केव्ही उपकेंद्राचे उपअभियंता दवंडे यांनी तर चक्क नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांना मिटींगमध्ये खोटी माहिती सांगत साईबाबा खडी केंद्रला कारेगाव ३३केव्ही उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जात नसल्याची चुकीची माहिती देत आमदार महोदयाची फसवणूक केली हे मुजोर अधिकारी आमदार महोदयाची फसवणूक करतात तर मग सामान्य जनतेचे काय ? असावा उपस्थित केला जात आहे. केटीएथ कंपनीचे काही कर्मचारी हे कारेगाव उपकेंद्रावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यास मटन दारूच्या पार्ट्या देत ते उपकेंद्रअंतर्गत येणाऱ्या २२ गावातील विद्युत पुरवठा दिवसा चार ते पाच तास तसेच रात्रीच्या वेळी चार तेपाच तास बंद करून खडी क्रेशरला दिला जातो. यामुळे कारेगाव,खडकमांजरी, वाळकेवाडी, सायाळ, पांगरी, भाद्रा, शिवणी जामगा, शेलगाव, हरसद, या गावकऱ्यांचे भर उन्हाळ्यात झाले उठले आहेत. अनेक गावातील सरपंचांनी तक्रार केल्या तरी पण परस्थिती जैशे थी या मुजोर अधिकाऱ्यांना कुणी वाली मिळेल का अशीही चर्चा गावकरी करीत आहेत.